रुग्णांचा अभिप्राय

6th of July 2017 was in operation theater …praying to god for my life…bt ws nt aware that god itself around me as doctors to save my life…today i count as my real birthday…one yr completed…m blessed…Before saying that you r an extraordinary doctor, i want to tell u that u r an extraordinary human beig.Thanks for showing me so much care n concern…ty team sahiyadri

Mr Apoorav Gandhi

डॉक्टरांच्या रूपातील देवदूत-डॉ. बिपीन विभूते व टीम”. #यकृताशी संबधित रुग्णांसाठी जणू पंढरीचा पांडुरंगच”. यकृत पूर्णपणे निकामी झालेल्या माझ्या मामाना डॉ. बिपीन विभूते(Consultant Liver Transplantion)व त्यांच्या टीमने 1फेब्र् तारखेला 1 वर्षापूर्वी Liver Transplant चे यशस्वी ऑपरेशन केले.व त्यांना वेदनादायी आजारापासून मुक्त केले, त्याच बरोबर वेळोवेळी मामाना लागणारी सर्वोतोपरी मदत केली. आज ते एकदम निरोगी आयुष्य जगत आहेत. माझ्या मामाना दिलेल्या जीवदाना-बद्दल माझ्या संपूर्ण परिवाराकडून सह्याद्री हॉस्पिटल मधील डॉ. बिपीन विभूते, डॉ. मनीष पाठक, राहुल तांबे व डॉ.अभिजीत माने अरुण सर व ट्रान्सप्लांट सेन्टर मधील सर्व टीमचे ते करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल आभार. व निरंतर अशीच सेवा कराल, ही सदिच्छा. मामाना बघून मिळत असलेल्या समाधानाबद्दल सर्व टीमची कृत-ज्ञता व्यक्त करत आहे .”अशा या दुर्धर आजारातही न हरलेल्या मामाच्या इच्छा शक्तीला व डॉक्टरांच्या कार्याला सलाम

संजय काशीद9049303132

मी आज एका देवदूता विषयी काही गोष्ट सांगणार आहे कदाचित ते अस लिहील म्हणून चिडतील पण खरेच सांगतो. डॉ. विभूते हे एक माणसातील देव आहेत . माझा भाऊ अजित यास बऱ्याच दिवसापासून लिव्हरचा त्रास होत होता. पुण्यातील नामांकित डॉ. कडे उपचार चालू होते , खूप खर्च केला पण ते डॉ. फक्त आजार थांबवत होते कमी करता येयील अस काहीच नाही . दिवसे दिवस अजितला त्रास वाढू लागला आणि अचानक डॉ कलशेट्टी ते आमचे मित्र आहेत त्यांनी मला डॉ. विभूते यांच्याकडे आपण जाऊ असे सांगितले त्रास इतका वाढला होता कि काय करावे कळत नव्हते. आणि एक दिवशी डॉ. विभूते कडे गेलो आणि त्यांना भेटलो पहिल्याच भेटीत त्यांचा सकारात्मक विचार ऐकून मला विश्वास बसला आता अजित चांगला होणार सरांनी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्याच पण खर्चाची काळजी करू नका हेही सांगायला विसरले अहित. बोलण्यातला गोडवा इतका कि देतात प्रेमात पडाव अस वाटत सरांनी आणि त्यांच्या टीमने सर्व कागद पत्राची पूर्तता स्वस्त औषधे कशी मिळतील सर्व ब्लड टेस्ट स्वस्त कसा होईल याची सर्व काळजी घेतली व सावकाश ऑपरेशन पूर्ण केलेच पण नंतर सुद्धा कायम चौकशी केली व अजितला नवीन जीवन दिल आज अजित सर्व सामान्य माणसा सारखे जीवन जगतो आहे. मनीष सर , माने सर, मनोज सर, दिनेश सर, राहुल सर , अरुण सर, सर्व नर्सिंग स्टाफ आणि सर्व टीम खूप भारी आहे त्यांना मानाचा मुजरा आणि कोणालाही लिव्हरचा आजार असेल तर डॉ. विभूते सारखा दुसरा डॉ. नाही हे मी आवर्जून सांगतो. या देवदूताला गणराया उदंड आयुष्य देवो आणि हजारो पेशंट नीट करो हीच गणराया चरणी प्रार्थना.
देव देवळात असतो माहित होत पण डॉ. विभूते सारखी लोक हॉस्पिटल मध्ये राहून देवच काम करीत असतात व खऱ्या अर्थाने मानवतेच्या महामंदिराची निर्मिती करीत असतात त्या देवाला पुन्हा एकदा त्रिवार वंदन.

अजित डोके9422303401

मी पेशंट बबनराव शंकरराव राजूरकर ( वय ७४ वर्ष ) अकलूजवरून सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी आलो लघवीतून रक्त जाण्याचा त्रास मला होत होता. मला मुधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्या कारणामुळे अकलूज वरून डॉ. श्रीकांत देवडीकर व डॉ. नितीन थिटे यांनी उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल मध्ये पाठविले. डॉ. बिपीन विभूते आणि त्यांचे सर्व युनिट यांनी बहुमोल सहकार्य दिले. लिव्हरमध्ये गाठ असल्याचे निदान झाल्यानंतर डॉ. विभूते यांनी ऑपरेशन केले. डॉ. विभूते यांनी आजार वाढू नये म्हणून लगेचच ऑपरेशनचा निर्णय घेतला व अतिशय कुशलतेने ऑपरेशन केले. ऑपरेशनचा दुखवा काहीच जाणवला नाही. डॉ. बिपीन विभूते सर व त्यांचे युनिट या सर्वांनी अतिशय जिव्हाळ्याची व आदराची वागणूक दिली त्यामुळे मला नवजीवन मिळाले.
सह्याद्रीचा सर्व स्टाफ यांनी सहकार्याची वागणूक दिली. हॉस्पिटलमधील स्वच्छता शिस्त अतिशय चांगली आहे. सहकार्याबद्दल शतशः प्रणाम.

बबनराव शंकरराव राजूरकर