यकृत सिरोसिस

यकृत सिरोसिस

सिरोसिस एक हळुवारपणे वाढत जाणारा आजार आहे ज्यामध्ये निरोगी यकृतामध्ये गाठी तयार होतात आणि यकृताची कार्यक्षमता कमी होते. सिरोसिस म्हणजे लिव्हरला सूज येणे, लिव्हर प्रमाणापेक्षा जास्त खराब होणे. लिव्हर किती टक्के खराब झाले आहे, यावर त्याचे उपचार अवलंबून असते.

सिरोसिसचे लक्षणे

सिरोसिसची लक्षणे आजाराच्या स्टेज प्रमाणे बदलतात. सुरुवातीच्या स्टेज कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. जसा आजार वाढतो तशी सिरोसिसची लक्षणे दिसू लागतात.

 • डोळे पिवळे होणे
 • पोट फुगणे
 • पोटात पाणी भरणे
 • पायाला सूज येणे
 • उल्टीद्वारे आणि शौचाद्वारे रक्त येणे
 • खाज सुटणे
 • वारंवार थकवा येणे
 • भूक कमी लागणे
 • श्वसनास त्रास होणे

यकृताच्या सिरोसिसचा उपचार काय आहे?

 • लिव्हर सिरोसिस पहिल्या टप्प्यात असेल तर ते वेळेवर औषध उपचार केल्यास पुढच्या स्टेजमध्ये जाण्यापासून बचाव करू शकतो. लिव्हर हे ७० टक्क्यांपेक्षा जास्त खराब झाले असल्यास शेवटी प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय राहतो . यकृत प्रत्यारोपणानंतर पेशंट लिव्हर सिरोसिस च्या अगोदर जसा होता तसा व्यवस्थित आयुष्य जगू शकतो.
 • अल्कोहोल पिणे बंद करणे
 • जर एखाद्या व्यक्तीला हिपॅटायटीस B आणि हिपॅटायटीस C झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे.
 • स्वयंप्रतिकार रोग(Autoimmune Disease), विल्सन रोग (Excessive Copper Deposition) किंवा हेमोक्रोमॅटोसिस (Iron Deposition) मुळे सिरोसिस असणा-या व्यक्तींसाठी उपचार वेगवेगळे असतात.
liver diseases treatment in pune