सह्याद्री हॉस्पिटलबद्दल

सह्याद्री अवयव प्रत्यारोपण केंद्र

सह्याद्री रुग्णालय ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी रुग्णालयांची शृंखला आहे जी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उत्तरदायी आहे. जिथे गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध, प्रवेशयोग्य व उत्तरदायी बनविण्यासाठी तत्त्वज्ञानावर कार्यरत आहेत. एप्रिल 2016 मध्ये, सह्याद्री हॉस्पिटल्सने पुण्यातील लिव्हर व पॅनक्रियास ट्रान्सप्लान्टसाठी अत्याधुनिक केंद्र सुरू केले ज्यामुळे ट्रान्सप्लंटस परवडण्याजोग्या आणि सर्व उपलब्ध होऊ शकल्या. कमी कालावधीच्या आत, हे पश्चिम भारतातील सर्वात विश्वसनीय यकृत प्रत्यारोपण केंद्र म्हणून ओळखले जाते. आमच्याकडे लिवर च्या सर्व आजारावरील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचारांची उपलब्धता आहे. आमच्या टीम ला 600 हून अधिक प्रत्यारोपनाचा अनुभव असून टीममध्ये लिवर तज्ञ , कॅन्सर तज्ञ , इंडोस्कोपी तज्ञ , आहार तज्ञ , फीजिओथेरपी अश्या विविध प्रकारच्या तज्ञांचा समावेश आहे. या सर्व तज्ञांचा सल्ला तसेच नवीन उपचार पद्धती यामुळे रुग्णाला त्यांच्या आजारसंबंधित सर्वोत्तम उपचार पद्धती निवडण्यास मदत होते.

प्रत्यारोपण कार्यक्रमाचे ध्येय

प्रत्येक जीवन अमुल्य आहे प्रत्येक गरजु व्यक्तीला जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे. आमच्या संघातील प्रत्येकजण अत्यंत काळजीपूर्वक व उच्च दर्जाची रुग्णसेवा पुरवतो. एक संघ म्हणून, आम्ही आमच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम संभाव्य पद्धती आणण्याचा प्रयत्न करतो आणि उत्कृष्टता, व्यावसायिकता आणि सतत कौशल्यातील सुधारणा करण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करतो.

प्रत्यारोपण कार्यक्रमाचा उद्देश

  • यकृताच्या रुग्णांना अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे सेवा प्रदान करणे.
  • गुणवत्तेशी तडजोड न करता रुग्णांची योग्य काळजी घेणे.
  •  यकृत प्रत्यारोपणाला प्रमुख ऑपेरेशन चा दर्जा देणे.
  •  प्रत्येक यकृत त्रासित रोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट दर्जाचे तज्ज्ञ उपलब्ध करून देणे.

सह्याद्री अवयव प्रत्यारोपण केंद्राची वैशिष्ट्ये

  • परवडणारे आणि प्रवेशयोग्य लिव्हर ट्रान्सप्लान्ट
  • रुग्णांसाठी यकृत विशेष अतिदक्षता विभाग
  • कॉम्प्लेक्स लिवर, पित्तविषयक शस्त्रक्रिया
  • यकृत रोग असलेल्या रुग्णांच्या काळजीसाठी “यकृत टीम” ची 24 X 7 उपलब्धता
  • यकृत प्रत्यारोपणासाठी आणि इतर शस्त्रक्रियांसाठी परवडणारे पॅकेजेस
  • A-Z लिव्हर वेलनेस क्लिनिक