FAQ’s

अवयव दान ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एखादी जीवंत व्यक्ती(एखाद्या दुर्मिळ परिस्थितीमध्ये) किंवा मृत व्यक्ती(त्याचा मृत्यूपुर्वी) त्याच्या इच्छेनुसार त्याच्या शरीरातील अवयव दान करुन इतरांना जीवदान देते.दान केलेले अवयव त्यानंतर एखाद्या गरजू रुग्णाच्या शरीरात ट्रान्सप्लान्ट केले जातात. जाणून घ्या ‘अवयवदान एक महादान’

तुम्ही तुमचे अवयव दान करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा एखाद्या हॉस्पिटल अथवा सामाजिक संस्थेमध्ये(एन.जी.ओ.)तुमची नावनोंदणी करु शकता.

मृत्यूनंतर अवयव दान करण्यासाठी आधीच अवयवदाना साठी नाव रजिस्टर करावे लागते.एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे नातेवाईक त्याच्या शरीरातील अवयव दान करतात.

अवयव दाना विषयी तुमचे कुटूंब अथवा नातेवाईक यांना माहित असणे गरजेचे असते.कारण त्यांच्या परवानगी शिवाय अवयव दानाची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही.

अर्भकापासून ते १०० वयाच्या वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही अवयव किंवा पेशींचे दान करु शकतात.मात्र हे त्यावेळी त्यांच्या शरीरातील अवयव दान करण्यासाठी कितपत योग्य आहेत यावर अवलंबून आहे.

मद्यपान करणा-या व्यक्तींना त्यांच्या काही अवयवांचे दान जरी करता नाही आले तरी ते डोळे किंवा त्वचा दान करु शकतात.मात्र हे त्यावेळी त्यांच्या काही तपासण्या करुन ठरवण्यात येते.

अशा वेळी डॉक्टर त्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासतात,तसेच इतर काही शरीरिक तपासण्या करतात.त्यानंतरच त्याचे अवयव दान करण्यासाठी योग्य आहेत का हे ठरवण्यात येते.

प्रत्येकवेळी असे करता येत नाही.मात्र जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि ती व्यक्ती ब्रेनडेड घोषीत करण्यात आली.तर अशावेळी कुटूंबातील सदस्य अवयव दानाचा निर्णय घेऊ शकतात.

असे करता येते मात्र त्यासाठी लवकर निर्णय घेणे आवश्यक असते.ती व्यक्ती वेंटीलेटरवर असतानाच हा निर्णय घ्यावा लागतो.कारण मृत्यूनंतर काही ठराविक वेळेतच अवयव दान करता येणे शक्य असते.

कोमा मध्ये गेलेली व्यक्ती परत पुर्ववत होते मात्र ब्रेनडेड मध्ये असे घडणे शक्य नसते.कारण ब्रेनडेड व्यक्तीचा मेंदू पुर्णपणे निकामी झाल्याने त्या व्यक्तीचा जवळजवळ मृत्यूच झालेला असतो.

अवयव दान विनामुल्य दान आहे.या दानासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही.यासाठी फक्त तुम्ही तुमचे नाव अवयव दान करणा-या संस्थांमध्ये रजिस्टर करणे आवश्यक असते.

एखादी व्यक्ती तिचे ह्रदय,यकृत,मूत्रपिंड,त्वचा,डोळे,फुफ्फुसे आणि शरीरातील पेशी दान करु शकते.अगदी दुर्मिळ परिस्थिती मध्ये आतडे देखील दान केले जाते.

हे पुर्णपणे त्या अवयवाच्या स्थितीवर तसेच ते त्या मृत व्यक्तीच्या शरीरातून ते अवयव किती वेळात बाहेर काढले आहेत यावर अवलबूंन असते.मात्र असे असले तरी मृत शरीरातून बाहेर काढलेले ह्दय व फुफ्फुसे ४ ते ६ तास,यकृत १२ तास व मूत्रपिंडे 24 तास जीवंत राहू शकते.

जीवंत व्यक्तीचे अवयव दान करता येतात.मात्र असे दुर्मिळ परिस्थितीत घडते.जर त्या व्यक्तीच्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला त्याच्या अवयव दानामुळे जीवदान मिळणार असेल तरच असे अवयव दान करण्यात येतात.

जेव्हा तुम्ही तुमचे नाव अवयवदाना साठी एखाद्या संस्थेमध्ये नोंदवता.ती संस्था तुम्हाला एक ते दोन आठवड्यामध्ये तुमचे डोनरकार्ड देते.

अवयवदान हे मृत्यूनंतरही कुटूंबातील व्यक्तींच्या परवानगी शिवाय करता येत नाही.त्यामुळे नाव रजिस्टर केल्यानंतर जर तुम्हाला अवयवदान करायचे नसेल  तर तुम्ही तशी कल्पना तुमच्या कुटूंबियांना देऊ शकता.

मृत्यूनंतरही कुटूंबियांनी परवानगी दिली तरच अवयव दान करता येतात.त्यामुळे जर कुटूंबाला मान्य नसेल तर अवयव दान करणे शक्य नसते.

मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे मृत शरीर कुटूंबाच्या हवाली करण्यात येते.त्यामुळे त्या व्यक्तीचा ज्या शहरात मृत्यू होतो त्या शहरात त्या व्यक्तीचे अवयव दान करता येतात.

अवयव दान पूर्णपणे विनाशुल्क केले जाते.त्यामुळे या प्रक्रियेसाठी त्याच्या नातेवाईकांना पैसे भरण्याची आवश्यकता नसते.

त्वचादान करता येते.जे रुग्ण गंभीर त्वचारोगाने किंवा त्वचा भाजल्याने पिडीत असतात त्यांना यामुळे जीवदान मिळू शकते.

सर्व संस्कृतीमध्ये अवयव दान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगितले जाते त्यामुळे अवयव दानाला आपली संस्कृतीही प्रोत्साहनच देते.

त्वचादान करताना फक्त त्या मृत शरीराच्या वरच्या स्तरावरीलच त्वचा काढली जाते.त्यानंतर त्या भागाला पट्टया लावल्या जातात त्यामुळे तो भाग बाहेरुन दिसत नसल्याने मृतदेह विद्रूप दिसत नाही.

अवयव दान केल्यानंतर ते विकले जात नसून एखाद्या गरजूच्या शरीरात ट्रान्सप्लान्ट करण्यासाठी पाठविले जातात.त्यामुळे एखाद्या गरजूला जीवदान मिळते.

जिवंतपणी करता येणारे: रक्त, त्वचा व यकृत व अस्थीमज्जेचा (bone morrow) काही भाग, दोन मूत्रप‌िंडापैकी एका मूत्रपिंडाचे दान

मृत्यूनंतर करता येणारे: नेत्रदान व त्वचादान.

‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित केल्यानंतर: नेत्र, त्वचा, अस्थी, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्या, हृदय, फुप्फुस, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांचे दान होऊ शकते.

एखाद्या पेशंटच्या मेंदूला मार लागला किंवा मेंदूला अन्य काही कारणांमुळे इजा झाली, तर तो पेशंट ब्रेनडेड झाला, हे संपूर्णपणे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ठरवते. यामध्ये सरकारने मान्यता दिलेल्या चार डॉक्टरांची टीम असते. ब्रेनडेड घोषित करण्यासापूर्वी सहा तासांत दोन वेळा अशा पेशंटची तपासणी केली जाते. मगच पेशंट ब्रेनडेड झाल्याचे नातेवाईकांना सांगितले जाते. पेशंट ब्रेनडेड झाल्याचे प्रमाणपत्रही दिले जाते. ब्रेनडेड पेशंट म्हणजे मेंदू मृत होतो पण हृदय, किडनी, लिव्हर अशा अवयवांचे कार्य सुरूच असते. या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते. अर्थात त्यासाठी नातेवाईकांची परवानगी घ्यावी लागते.

ब्रेनडेड पेशंट पुन्हा जीवंत होण्याची शक्यता नसते. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सहा तासांत दोनदा पेशंटची वैद्यकीय तपासणी करूनच ब्रेनडेड झाल्याचे घोषित करते. त्यामुळे तो वाचण्याची शक्यता नसते. ब्रेनडेड पेशंट व कोमातील पेशंट यांमध्ये फरक आहे. कोमातून पेशंट बाहेर येऊ शकतो. कोमात गेलेल्या पेशंटचे अवयव प्रत्यारोपणासाठी घेतले जात नाहीत.

राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात देहदान समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागात देहदान इच्छापत्राचा छापील नमुना उपलब्ध आहे. तो भरून या विभागात सादर करता येतो. इच्छापत्र भरून दिल्यावर या विभागाव्दारे नोंदणीपत्र व क्रमांक, सबंधित डॉक्टर्सचे टेलीफोन नंबर, आयबँक आदीची माहितीही दिली जाते.

मृत्युशय्येवर असताना जर एखाद्या व्यक्तीने देहदानाची इच्छा व्यक्त केली, तरीही देहदान स्वीकारले जाते. फक्त मृताच्या नातेवाईकांना ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागते. देहदान जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये करता येते. मृतदेह हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था नातेवाईकांनाच करावी लागते. मतृदेह आणताना ओळखपत्र, नोंदणी केली असल्यास त्याची माहिती, मृत्यूचा दाखला सोबत न्यावा

मृत्यूनंतर तीन ते चार तासांमध्ये नेत्रदान होणे आवश्यक असते. नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर त्वरित जवळच्या नेत्रपेढीला कळवणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी नेत्रदानाचे प्रतिज्ञापत्र भरले नसले, तरीही वारसदार व्यक्ती मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात.

अवयवदानाच्या चळवळीत झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी सेंटरची भूमिका महत्त्वाची असते. एखादा पेशंट ब्रेनडेड झाल्यावर झेडटीसीसीचे स्वयंसेवक हॉस्पिटलमध्ये जाऊन अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगतात. ब्रेडडेड पेशंटची किडनी, लिव्हर, नेत्र असे अवयव मिळाल्यास दुसऱ्या पेशंटला नवीन जीवन मिळते.